भुसावळ विभागात लोहपुरूषांना अभिवादन
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त भुसावळातील जुना सातारा भागातील पुतळ्याला अभिवादनासाठी दिवसभर गर्दी
भुसावळ : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार, 31 रोजी भुसावळ शहर व विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. थोर पुरूषांच्या प्रतिमांचे प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच मान्यवरांचा महिमाही यावेळी सांगण्यात आला. भुसावळातील जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी दिवसभर गर्दी जमली होती. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आले.
भुसावळ कृउबा समिती
भुसावळ : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन कृउबा सभापती सचिन संतोष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेतकी संघाचे चेअरमन पंढरी पाटील, विलास देवकर, गजु सरोदे, प्रशांत निकम, अशोक सरोदे, सुरेश येवले, प्रवीण पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी केले अभिवादन
भुसावळ : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त जुना सातारा भागातील पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, लेवा युवा शहराध्यक्ष देवा वाणी, मनीष पाचपांडे, यतीन पाटील, रुपेश बर्हाटे, गिरीश भिरुड आदींची उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
काँग्रेसतर्फे लोहपुरूषांना अभिवादन
भुसावळ : जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग व राजीव गांधी वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने नसरवांजी फाईल भागातील राजीव गांधी वाचनाल्यात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी.कोटेचा, शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सलीम गवळी यांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी शहर महिला काँग्रेस उपाध्यक्षा हमीदा गवळी, इब्राहीम खान ऊर्फ राजा भाई, जॉनी गवली, यास्मीन कुरैशी, सायरा बानो, अलीश बा, आरीश शे., शिला इंदर परदेशी, शमीम कुरैशी, महेरून निस्सा आदींची उपस्थिती हाते.
भाजपा पदाधिकार्यांनी केले अभिवादन
भुसावळ : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त जुना सातारा भागातील पुतळ्याला आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक युवराज लोणारी, पुरुषोत्तम नारखेडे, अॅड.बोधराज चौधरी, परीक्षीत बर्हाटे, राजुभाऊ नाटकर, वसतं पाटील, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, मुकेश पाटील, प्रमोद नेमाडे, शहर सरचिटणीस अमोल महाजन, पवन बुंदेले, शहर उपाध्यक्ष प्रशांत पाटील, अजय भोळे, शेखर इंगळे, अनिरुद्ध कुलकर्णी, विशाल जंगले, किरण सरोदे, प्रशांत नरवाडे, रमाशंकर दुबे, चेतन बोरोले, बिसन गोहर, बाळु कोळी, नंदकिशोर बडगुजर आदींची उपस्थिती होती.
शेतकरी संघर्ष संघटना
भुसावळ : शेतकरी संघर्ष संघटना व आनंद नगर रीक्षा स्टॉपतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. शेतकरी संघर्ष संघटना भुसावळ तालुका कार्याध्यक्ष भिकाजी बाणाईत, भुसावळ शहराध्यक्ष देवेंद्र वराडे (आप्पासाहेब), बंटी सोनवणे, गजानन सोनार, गजानन कोलते, चेतन वाघ, प्रशांत खोंडे (पप्पू), तुषार बाणाईत, गिरीश नाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हंबर्डी जि.प.शाळा व ग्रामपंचायत कार्यालय
हंबर्डी : यावल तालुक्यातील हंबर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत पत्रकार खेमचंद पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शाळेच्या मुख्यध्यापिका केदारे व संदीप बोरोले उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण ग्रामसेवक बी.व्ही.वायकोळे यांच्याहस्ते करण्यात आले. जि.प.चे शिक्षक संदीप बोरोले, खेमचंद पाटी, ग्रामपंचायत शिपाई उमा तडवी, हेमंत नेहेते उपस्थित होते.
सावद्यात चौकाला सरदार पटेल यांचे नाव देण्याचा प्रस्ताव
सावदा : इंदिरा गांधी चौकाजवळील पाटीलपूरा परीसरात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रसाददासजी हे होते. त्यांनी पाटीलपूरा परीसरातील चौकास सरदार पटेल यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी देखील आपले विचार मांडले. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनीदेखील आपले विचार मांडताना सरदार पटेल यांच्या विचारांची आज खर्या अर्थाने भारतास गरज असल्याचे सांगितले. यावेळी शास्त्री भक्तीप्रसाददासजी, उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, बाजार समिती सदस्य पंकज येवले, स्वामीनारायण गुरुकुलचे सचिव पी.डी.पाटील, अतुल नेहेते, कुशल जावळे, बंटी बढे, देवेंद्र धांडे, सुनील (बंटी) जंगले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षय सरोदे यांनी केले.

