भुसावळातील अल्पवयीन तरुणीला पळवणारा आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
आरोपीविरुद्ध अल्पवयीन तरुणीचा विनयभंगाचा आरोप : नंतर तरुणीलाच पळवले
भुसावळ : अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात एका तरुणाविरुद्ध विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल होता व नंतर मात्र या गुन्ह्यातील तरुणाने त्या तरुणीलाच पळवून नेल्याची घटना 29 ऑक्टोबर रोजी घडली होती व या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवून दोन्ही गुन्ह्याच एकच असलेल्या आरोपीला रविवारी अटक केली आहे. प्रशांत उर्फ किरण काशिनाथ अडकमोल (19, रा.व्दारका नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेण्यात आले असून तिला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अन धमकी खरी करून दाखवली
शहरातील एका भागातील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडीतेसह तिच्या आईने बाजारपेठ पोलिसात 29 रोजी रात्री तक्रार नोंदवली होती. मुलीचा विनयभंग केल्यानंतर पीडीतेच्या आईने आरोपीला जाब विचारल्यानंतर त्याने मुलीला पळवून नेल्याची धमकीही दिली होती व या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने शनिवारी पीडीत अल्पवयीन तरुणीलाच पळवून नेल्याने शनिवार, 31 रोजी रात्री भादंवि 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कंडारी गावातून केली अटक
आरोपी हा तालुक्यातील कंडारी येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास दुपारी साडेतीन वाजता अटक करण्यात आली. प्रशांत उर्फ किरण काशिनाथ अडकमोल असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोटला, एएसआय तस्लीम पठाण, नेव्हील बाटली, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे ,सचिन चौधरी, योगेश माळी, सुभाष साबळे, योगेश महाजन आदींनी केली.

