भुसावळात रस्ते घेणार मोकळा श्‍वास


भुसावळात सलग चौथ्या दिवशी स्टेशन रोड, जामनेर रोड व शहर हद्दीत कारवाई

भुसावळ : भुसावळातील बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी नूतन पोलिस उपअधीक्षकांनी कंबर कसली आहे तर सोबतच शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ता अडवून बसलेल्या विक्रेत्यांसह बेकायदा फलक लावणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. शुक्रवारपासून सलग चौथ्या दिवशी सोमवारीदेखील पोलिसांच्या तीन पथकांनी स्टेशन रोड चौकी ते सराफ बाजार, अष्टभूजा मंदिर ते जामनेर रोड तसेच शहर हद्दीतील पोलिस ठाणे ते यावल रोडदरम्यान रस्ता अडवून बसणार्‍या अतिक्रमण धारक व्यावसायीकांना शाब्दीक समज देत अतिक्रमण हटवण्याच्या सूचना केल्या अन्यथा पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 194 नियम मोडणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई झाली तर सोमवारी सुमारे 218 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येवून 44 हजार 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

पालिका व पोलिसांचे पथक अतिक्रमण हटवणार
बाजारपेठ पोलिस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी खडकारोड, रजा टॉवर, डॉ.आंबेडकर पुतळ्यापर्यंत वाहतुकीला अडथळा ठरणारे विक्रेते आणि वाहनधारक अशा 194 जणांवर रविवारी कारवाई करीत तब्बल 38 हजार रुपयांचा दंड वसूल केला. जामनेर रोडवर अडथळा निर्माण करणार्‍या विक्रेत्यांना पोलिसांनी समज देत यापुढे अतिक्रमण करून दुकाने लावल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला. सोमवारी प्रत्येकी आठ जणांच्या तीन पथकांद्वारे कारवाई करण्यात आली. बाजारपेठ हद्दीतील स्टेशन चौकी ते सराफ बाजार, जामा मशीद तसेच दुसर्‍या टीमने अष्टभूजा देवी मंदिर ते नाहाटा चौफुली तसेच शहर हद्दीत पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी शहर पोलिस ठाणे ते यावल रोड, गांधी पुतळा परीसरात अतिक्रमण धारकांना पायी गस्त घालत समज दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !