भुसावळातील प्रभाग क्रमांक दहामध्ये धुरळणी
डेंग्यू रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्येने वाढली चिंता : नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक दहामध्ये डेंग्यू रुग्णांची सातत्याने होणारी वाढ पाहता डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी नगरपालिकेच्या सहकार्याने या भागात धुरळणी करण्यात आली. या भागाच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका मेघा वाणी, सामाजिक कार्यकर्ते देवा वाणी यांनी डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ज्या भागात अद्याप धुरळणी झालेली नाही त्या भागात मंगळवारी धुरळणी होणार असल्याचे देवा वाणी यांनी सांगितले. डास व मच्छरांचा उपद्रव धुरळणीमुळे कमी होण्याची आशा व्यक्त होत आहे. शहरात सातत्याने वाढणार्या डेंग्यूच्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे.

