वरणगावच्या कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात केला प्रवेश


वरणगाव : बजरंग दलाचे एकनिष्ठ कार्यकर्ते समाजसेवक संदीप भोई यांच्यासह अ‍ॅड.ए.जी.जंजाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भुसावळातील भाजपा बैठकीत जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अडीच वर्षांच्या काळात वरणगाव शहरात विविधांगी विकासकामे केल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून पदाधिकार्‍यांनी भाजात प्रवेश केला.

यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
भुसावळात नुकतीच भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सरचिटणीस रवी अनासपुरे, प्रदेश मंत्री खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, प्रदेश संघटन प्रमुख किशोर काळकर, डॉ.विजय धांडे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची उपस्थिती होती. संदीप भोई व अ‍ॅड.ए.जी.जंजाळे यांनी सांगितले की, आम्ही निस्वार्थीपणे कुठल्याही पदाची लालसा न ठेवता भाजपात प्रवेश करीत आहोत. वरणगाव नगरपरीषदेवर पुन्हा भाजपाची सत्ता आणण्यासाठी जीवाचे रान करू व वरणगाव शहरात हाजारो कार्यकर्त्यांना जोडू, असेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !