भुसावळात रुग्णांना मिठाईसह फळ वाटप करीत साजरी केली ईद


भुसावळ : ईद ए मिलादच्या निमित्ताने खडका रोडवरील ममता हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ डॉ.तारीक आरीफ शेख यांनी रुग्णालयाच्या एकूण 22 रुग्णांसह कर्मचार्‍यांना सफरचंद, चिवडा व मिठाई देऊन अनोख्या पद्धत्तीने ईद साजरी केली. डॉ.तारीक शेख आणि त्यांच्या पत्नी डॉ.मीनाझ शेख हे दाम्पत्या वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक कार्यातही आघाडीवर आहेत. त्यांचे वडील आरीफ शेख हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते व ते आता रुग्णालय आणि समाज सेवेद्वारे सामाजिक कार्य करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !