भुसावळात ईदनिमित्त युवक काँग्रेसकडून रक्तदान शिबिर


भुसावळ : भुसावळ विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष ईम्रान खान यांनी मुस्लिम कॉलनी, खडका येथे ईद मिलादुन्नबीच्या पवित्र दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात 52 दात्यांनी रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती
शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नीळकंठ फालक होते तसेच रक्तदान करणार्‍या दात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुन्वर खान, शहराध्यक्ष रवींद्र निकम, सलीम गवली, रफीक पहेलवान, नजीम शाह, मोईनुद्दीन सर, ईद्रीस खान, छोटु भाई, हमीदा गवली व गोदावरी रक्तपेढीचे डॉ.भारंबे सर, डॉ.मेहरून नीसा, लक्ष्मण पाटील, अकबर सर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अमीर खान, शे.सोऐब, शै.तोसीफ, शे जमील, वसीम शाह, शे. रशीद,अमीर खान, शे. नूरु, मोईन मनीयार, इरफान खान, अलीम खान या युवकांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !