वरणगाव नगरपरीषद कर्मचार्‍यांचे माजी मंत्री खडसेंना निवेदन


मुक्ताईनगर : वरणगाव नगरपरीषदेतील कर्मचार्‍यांचा पगार थकल्याने त्यांचे ऐन सणासुदीत हाल होत असून यासह अन्य समस्यांबाबत वरणगाव नगरपरीषद मजदूर संघाचे अध्यक्ष अनंत गडे व सभासद कर्मचार्‍यांनी मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. खडसे यांनी समस्या सोडवण्याबाबत सकारात्मक आश्‍वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक सुधाकर जावळे, राजेंद्र चौधरी, दीपक मराठे, अरुणा इंगळे, वैशाली देशमुख, रोहिणी जावळे, जागृती बढे, राजेश इंगळे, कर्मचार्‍यांमधून संजय माळी, मेघराज चौधरी, मुक्तार, जतीन सपकाळे, निलेश झांबरे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !