वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
भुसावळ : जळगावच्या पत्रकार भवनात बुधवारी वंचित बहुजन आघाडी संघटनेचा मेळावा झाला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड.धनराज वंजारी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.पक्षाच्या युवा आघाडी राज्य सदस्य शामिभा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
तर येणारी पिढी माफ करणार नाही
धनराज वंजारी म्हणाले की, गतकाळात केलेली नोटबंदी आणि आताचा कोरोना हे जातीय वातीचे शक्तींचे षडयंत्र आहे. बहुजन समाजाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा हा कुटील डाव आहे. तुम्ही सावध रहावे नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.
नूतन सदस्यांचे स्वागत
या मेळाव्यात ओ.बी.सी.बांधव आणि भगिनींनी पक्षात प्रवेश केला. त्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व प्रमोद इंगळे, प्रदेश युवा सदस्य शमिभा पाटील, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा महासचिव वंदना सोनवणे, जिल्हा उपाध्यक्षा संगीता भामरे, महिला जिल्हाध्यक्षा सुजाता ठाकुर यांनी पक्षाचे मफलर देवून सत्कार केला.
यांची मेळाव्यास होती उपस्थिती
मेळाव्यास जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर, रफिक बेग, डिगंबर सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे मुबारक पठाण, प्रकाश सरदार, अरुण तायडे, गमीर शेख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुजाता ठाकुर, बाळा पवार, सुपडा निकम (बोदवड), बालाजी पठाडे (भुसावळ), सचिन सुरवाडे (जामनेर), भिकाजी असलकर (मुक्ताईनगर), बाळासाहेब पाटील (एरंडोल), सुनील ठाकुर (भुसावळ), महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना सोनवणे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संगीता भामरे, देवदत्त मकासरे (मेजर), शिवाजीराव टेंभुर्णीकर, विद्यासागर खरात, सचिन वानखेडे, प्रमोद बावस्कर, गणेश महाले, सुमित सोनवणे, जितेंद्र केदार, राहुल सुरवाडे, अण्णा मोरे (भडगाव), रुपेश साळुंके (भुसावळ), बबन कांबळे, स्वप्नील सोनवणे, राजु इंगळे, विनोद लोखंडे, सुरेश सुरवाडे आदी उपस्थित होते.

