शिवसेना जनसामान्यांचे प्रश्न जिव्हाळ्याने मार्गी लावणारा पक्ष


आमदार चंद्रकांत पाटील : वेल्हाळे येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

वरणगाव : शिवसेना या पक्षाचा जन्म आंदोलनातून झालेला असून सामान्य माणसाचे प्रश्न जिव्हाळ्याने सोडविण्यात सतत प्रयत्नशील आणि अग्रेसर असलेला हा पक्ष असून भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे गाव या परिसरातील बेरोजगारी, राखेचे प्रदूषण, वाहतूक साठवणूक, वनजमिनीच्या दाव्यांचा प्रश्न व इतर प्रलंबित प्रश्न आपण लवकरच मार्गी लावू, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अतिथी म्हणून उप जिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.शाम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, शेतकरी सेनेचे सुभाष पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे सईद शेख भिकारी, जिल्हा युवा सेना अधिकारी चंद्रकांत शर्मा, शाखाप्रमुख प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष सोनवणे यांनी केले. जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभान चंदू गवळी, वैभव हेमंत पाटील, महाजन, रुपेश पाटील, तुषार बावस्कर, सागर चौधरी, अमोल ठोके, प्रशांत ठोके, मिलिंद पाटील, संजय लुले, ज्ञानेश्वर कोलते, राजू राणे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !