बोदवडमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार


बोदवड : शहरातील अग्रेसन भवनात व्यापारी संघटनेतर्फे कोरोनाच्या कठीण काळात जनसेवेसाठी झटणार्‍या योद्ध्यांचा सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, उपाध्यक्ष राजेश नानवानी, सचिव कैलास जावरे, तहसीलदार अभय पाटील, पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, वैद्यकीय अधिकारी मनोज चौधरी, नगराध्यक्ष मुमताज बी.बागवान, नगरसेवक दीपक झांबड, पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे, डॉ.संदीप जैन, बरडीया स्कुल अध्यक्ष अजय जैन, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सचिव विकास कोटेचा आदींची उपस्थिती होती.

यांचा झाला सन्मान
शहरासह तालुक्यात कोरोेना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिस प्रशासन, नगरपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, साफसफाई कर्मचारी, पत्रकार यांनी केलेल्या कामाची दखल घेवून त्यांचा व्यापारी संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार अभय पाटील व पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी मार्गदर्शन केले. दीपक चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहरातील सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !