शिक्षक शेख जावेद यांचा जीवन परीचय आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये


यावल : यावलचे शिक्षक शेख जावेद यांचा जीवन परीचय आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात भारतासह प्रामुख्याने अमेरिका, ब्राझील, नायजेरीया, इजिप्त, घना, मली आदी देशांचा समावेश आहे. वंडर अमेझिंग क्रिएटिव्ह बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या माध्यमातून प्रकाशीत करण्यात आलेल्या मॅगझीनमध्ये विश्वभरातून 25 मान्यवरांच्या सक्सेस स्टोरीज प्रकाशीत करण्यात आल्या आहेत.

हालाखीच्या परीस्थितीवर केली मात
यावल येथील शिक्षक जावेद शेख यांनी अत्यंत हालाखीच्या परीस्थितीवर मात करून शिक्षण सेवेसह समाजसेवा करून विविध राज्यांमधून पुरस्कार प्राप्त केलेले आहेत तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुध्दा त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !