यावल तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर : सुधीर पाटील


यावल : यावल शहरासह तालुक्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर राहणार असून जनता व पोलित दलात समन्वय निर्माण करण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही यावलचे नूतन पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली. गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला. तत्कालीन पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांची जळगाव मानव संसाधन विभागात बदली करण्यात आल्यानंतर रीक्त जागी नाशिक प्रशिक्षण केंद्रातून बदलून आलेले सुधीर पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. आगामी काळातील सण-उत्सवात तालुक्यातील कायदा सुव्यवस्था, जनतेत सलोखा कायम राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !