राज्यपाल नियुक्त आमदार : माजी मंत्री एकनाथराव खडसेंना संधी !


मुंबई : भाजपावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परीषदेवर आमदार म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे तर नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेनेकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यांनी यांना शुक्रवारी देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुळे यांनी राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान, या यादीतील नावाबाबत प्रचंड गोपनीयता असलीतरी कायदेशीर पूर्तता करून ही यादी राज्यपालांना सुपूर्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या नावांची अधिक चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथराव एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर तसेच शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक दावेदार असलेतरी नेमकी कुणाला संधी मिळते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !