बोदवड शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


बोदवड : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे आदिवासी समाजाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शुक्रवारी बोदवड शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला बोदवडमधील व्यापारी व नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहर पूर्णपणे बंद ठेवले.

घटना निंदणीय : आरोपींवर व्हावी कारवाई
आदिवासी भिल्ल समाज बांधवांनी आरोपींवर कारवाईबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच बोदवड तहसीलदार यांनाही निवेदन सादर केले. सारंगखेडा येथील 14 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर व निंदनीय निषेधार्थ आहे. यसा घटनेतील नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात कुणीही असे कृत्य करणार नाही व कुटुंबीयांना शासनाने 25 लाख रुपये मदत घ्यावी व कुटुंबियांना कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी बोदवड तालुक्यातील समस्त आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते.
निवेदनावर कालू गायकवाड,रणजीत मोरे,संजू गायकवाड,राजेश मोरे,विनोद मोरे,सुनील सोनवणे,रोहिदास पवार,शक्ती गायकवाड,अरुण गायकवाड,मनोज मोरे,संतोष मोरे,कुणाल गायकवाड,निंबाजी मोरे,उखा मोरे,तोताराम सोनवणे,सागर तोरे यांच्या सह्या आहेत




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !