बोदवडमध्ये चोरट्यांनी कपाशीसह ज्वारी लांबवली
बोदवड : शहरातील अरीहंत ट्रेडर्समधून चोरट्यांनी चार क्विंटल कपाशी आणि एक क्विंटल ज्वारी असे एकूण 22 हजार रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. जामनेर रोडवरील रांका हायस्कूलसमोर अरीहंत ट्रेडर्स हे दुकान असून चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडत 20 हजार रुपये किंमतीची चार क्विंटल कपाशी व दोन हजार रुपये किमतीची एक क्विंटल ज्वारी लांबवली. याप्रकरणी आकाश राजेंद्र जैन (26, बोदवड) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

