भुसावळात गोळीबाराची अफवा अन् पोलिसांची पळापळ !
आरपीडी रस्त्यावर गोळीबाराची होती चर्चा : रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चौकशी
भुसावळ : शहरातील आरपीडी रस्त्यावर गोळीबार झाल्याची माहिती शहर पोलिसांना कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते थेट कंडारीपर्यंत पोलिसांनी सर्वत्र घटनेची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता असा कुठलाच प्रकार झाला नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सतर्कता म्हणून शहरातील खाजगी रुग्णांलयांसह गोदावरीत संपर्क साधून एखादा जखमी उपचारार्थ आला काय? याबाबत विचारणा केली मात्र तसे काहीही घडले नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत याबाबत तपास सुरू होती.

