निंभोरा नूतन सहा.निरीक्षकांचा महाराष्ट्र राज्य मराठी ग्रामीण पत्रकार संघातर्फे सत्कार
खिर्डी : निंभोरा, ता.रावेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी निंभोरा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी ग्रामीण पत्रकार रावेर तालुका संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विलास ताठे, तालुका संघटक प्रदीप महाराज, सदस्य प्रमोद कोंडे, विनायक जहूरे, प्रभाकर महाजन आदींची उपस्थिती होती.
कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखणार
याप्रसंगी उनवणे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखत जनतेत समन्वय ठेवणार असल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरीकांमध्ये पोलिस दलाविषयी निश्चित आदर निर्माण होईल व गुन्हेगारी थोपवण्यासाठी प्रयत्न असतील तसेच सामाजिक, राजकीय व्यक्तित समन्वय राखणार असल्याचे स्वप्निल उनवणे यांनी सत्कारप्रसंगी सांगितले.

