भुसावळातील वृत्तपत्र हॉकर्स बांधवांची दिवाळी झाली ‘गोड’


विघ्नहर्ता पब्लिकेशन्सने जपली माणुसकी : सणानिमित्त मिठाईसह कपड्यांची भेट

भुसावळ : वृत्तपत्र हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असलातरी ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता वृत्तपत्र वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका हे वृत्तपत्र हॉकर्स ही मंडळी निभावत असते. मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या काळातही जीव धोक्यात घालून आपल्या व्यवसायाशी बांधीलकी जपत वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचवून प्रतिकुल परीस्थितीत आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढणार्‍या हॉकर्स बांधवांप्रती संवेदना जोपासत भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे संचालक रवींद्र निमाणी यांनी मंगळवारी सकाळी दिवाळी सणाचे औचित्य साधून सुमारे 70 हॉकर्स बांधवांना साडी, ड्रेस व मिठाईचे वाटप करून समाजात अद्यापही माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय दिला. निमाणी यांच्या उपक्रमाचे सर्वच वृत्तपत्र वाटप करणार्‍या हॉकर्स बांधवांनी मनपूर्वक कौतुक करीत आभारही मानले.

यांची होती उपस्थिती
साकळीच्या रशीद बाबा आश्रमाचे जितेंद्र नेवे उर्फ छोटू बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी, लुसी इन्फोटकचे संचालक मुकेश निमाणी, बंटी निमाणी, जळगाव दिव्य मराठी कार्यालयाचे वृत्तसंपादक आनंदा पाटील, दिव्य मराठीचे वितरण व्यवस्थापक कलीम खान, दिव्य मराठीचे उपसंपादक गोपाळ रोकडे, भुसावळ दिव्य मराठी कार्यालयाचे ब्युरो चीफ हेमंत जोशी, भुसावळ जनशक्ती विभागीय कार्यालयाचे प्रमुख गणेश वाघ, दिव्य मराठीचे रीपोर्टर श्रीकांत सराफ, देशदूत कार्यालयाचे मार्केटींग प्रतिनिधी शंतनू गचके, दिव्य मराठीचे जाहिरात प्रतिनिधी संजय ठाकूर, जय निमाणी, अरहम निमाणी, पूर्वी निमाणी, अक्षरा संचेती, कर्मचारी संगीता बेदरकर आदींसह वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !