भाजपला सत्ता बदलाचे लागलेय डोहाळे : आमदार चंद्रकांत पाटील
बोदवड तालुक्यात एक कोटी चार लाखांच्या विकासकामांचे भुमिपूजन
मुक्ताईनगर : पाच वर्षांत गावागावात जाऊन हायमास्ट लावायचे त्यावर नावे टाकायचे हीच कामे खासदारांचे असल्याने त्यांनी शेतकर्यांची दिशाभूल करु नये, आमच्याकडे सत्ता, आमदारकी आह. म्हणून आम्ही कोणाचा सूड काढू, असे आमच्यावर संस्कार नाही, सर्वांना सोबत घेउन चालण्याची आमची तयारी असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. तालुक्यातील हिंगणे, शिरसाळा, चिंचखेडसीम, राजूर, वरखेड खुर्द, घाणखेड, चिखली बुद्रूक, मनुर बुद्रूक या गावांत लेखाशिर्ष निधी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण, सामजिक सभागृह, जिल्हा परीषद शाळेची संरक्षण भिंत आदी मिळून एक कोटी चार लाख रुपय खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते झाले. यावेळी एणगांव येथील भाजपचे कार्यकर्ते असलेल्या सुभाष किंगे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.
भाजपला लागले सत्ता बदलाचे डोहाळे
आमदार पाटील म्हणाले की, केळी पीक विम्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या अनाठायी भुमिकेमूळे राज्य सरकारला तातडीने निर्णय घेता आला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भूसे यांच्यासोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यात ते सकारात्मक आहे. खासदारांनी आंदोलन करण्याऐवजी संसदेत प्रश्न उपस्थित केला असताख केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेतली असती तर बरं झाले असते म्हणून भाजप खासदारांनी आंदोलन करण्याचा अधिकार गमविला आहे. त्यांनी आंदोलन करून शेतकर्यांची दिशाभूल करू नये. पाच वर्षांत गावागावांत जाऊन हायमास्ट लावायचे, त्यावर नावे टाकायचे. हीच कामे खासदारांनी आतापर्यंत केल्याचा टोलाही त्यांनी हाणला. आज जे भुमिपूजन झाले तेच पुढच्या वर्षी करायचे ही आमची परंपरा नाही, असेही ते म्हणाले.
समस्या सोडवण्याची जवाबदारी माझी
मनुर येथील रस्ता काँक्रिटीकरणाच्या भुमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी कार्यकर्ते सागर पाटील यांनी गावांत गेल्या 35 वर्षात पिण्याच्या पाण्याची टाकी नसल्याची समस्या यावेळी मांडली. याचबरोबर विठ्ठल मंदिर सभागृह, आठ शाळा खोल्या, शेती रस्ते, स्मशानभूमी अश्या समस्या मांडल्या असता मनुर गावाचे माझ्यावर उपकार असून येत्या चार वर्षात ही सर्व कामे मार्गी लागलेले असतील याची जबाबदारी माझी, असल्याचे आमदार म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड.मनोहर खैरनार, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख प्रशांत टोंगे, तालुकाप्रमुख गजानन खोडके, माजी सभापती विरेंद्रसिंग पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष ईश्वर जंगले, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक डॉ.सुधीर पाटिल, नगरसेवक सुनील बोरसे, ईरफान शेख, माजी सभापती भारत पाटील, राष्ट्रवादी कार्यकर्ते सागर पाटील, जीवन जाट, प्रमोद शेळके, शिवाजी ढोले, शिवसेनेचे शांताराम कोळी, दीपक माळी, योगेश राजपूत, शुभम शर्मा, अमोल व्यवहारे, अॅड.मनोहर खैरनार यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

