भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग : अनेक गुन्हेगार जाळ्यात


वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासन अ‍ॅक्टीव्ह मोडवर

भुसावळ : शहरात सातत्याने वाढणारी गुन्हेगारी ठेचण्यासाठी पोलिस प्रशासन कसोशीने कामाला लागले आहे. दोन दिवसांपूर्वी आरपीडी रोडवर झालेली गोळीबाराची चर्चा व सर्चिंगमध्ये दरोड्याच्या प्रयत्नातील आरोपी आढळल्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री 11 ते पहाटे पाच दरम्यान शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाणे हद्दीत पोलिस अधिकार्‍यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी केली तसेच वॉरंटवर हजर न राहणार्‍या अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या नेतृत्वात विविध टीम तयार करून कोम्बिंग करण्यात आले. या कारवाईने गुन्हेगारांच्या गोटात खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !