सर्वांनाच शिक्षण मिळण्यासाठी आयुष्यभर स्व.देवीप्रसाद शर्मा झटले


प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह : स्व.भैय्याजींना सातव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

भुसावळ : हिंदी सेवा मंडळाचे तत्कालीन सचिव स्व.देवीप्रसाद शर्मा यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्व.शर्मा यांनी शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक चळवळीत दिलेल्या योगदानाच्या आठवणींना बुधवारी श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांनी उजाळा दिला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. आयुष्यभर सर्वांना शिक्षण मिळावे तसेच केजी टू पीजी शिक्षण प्रणालीसाठी त्यांनी काम केले, समान, गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी ते कायम आग्रही असायचे व शिक्षणातील वेगवेगळ्या प्रश्नांवर ते कायम पुढे असायचे, अशी भावना श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी व्यक्त केली.

भैय्याजी आजही एक उत्तम प्रशासक
प्राचार्य डॉ.सिंह म्हणाले की, हिंदी सेवा मंडळच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे. ते शेवटपर्यंत सक्रिय होते. पण, दुर्देवाने ते आपल्यातून निघून गेले, प्रतिकुल परीस्थितीचा सामना करून लक्ष साध्य करणारा थोर योद्धा म्हणून त्यांची ख्याती होती, समाजात आजही एक उत्तम प्रशासक म्हणून भैय्याजी ओळखले जातात, असेही ते म्हणाले.

संशोधनाला नेहमीच प्रोत्साहन : डॉ.गिरीश कुलकर्णी
भैय्याजी समाजाने एक अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले. त्यांनी त्यांचे जीवन आदर्श मूल्यांसह व्यतित केले. हिंदी सेवा मंडळ व श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आदर्श आणि लौकिक त्यांनी वाढवला होता. सदैव चळवळीतील, धडपड करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहिले त्यांना मदतीचा हात ते देत होते. संशोधनासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले, असे मत इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागाचे विभागप्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी म्हणाले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी हिंदी सेवा मंडळाचे सचिव मधुलताजी शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, व्यायामशाळा चेअरमन पंकजजी संड, कीर्ती संड, रमेश नागराणी, संजय नाहाटा, बिशनचंद अग्रवाल, डॉ.रवीकांत परदेशी, नंदकुमार अग्रवाल, संजय जोशी तसेच हिंदी सेवा मंडळाचे सर्व सभासद, विभाग प्रमुख डॉ.सुधीर ओझा, डॉ.गिरीश कुलकर्णी, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अजित चौधरी, डॉ. दिनेश पाटील यांचयासह हिंदी सेवा मंडळ संचलित सर्व महविद्यालय व विद्यालय यांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व कर्मचारी वृंद हजर होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !