भुसावळात दोन घरफोड्या करणारा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


भुसावळ : भुसावळ शहरातील स्टार मोबाईल व सुरभी कॉम्प्लेक्समधील न्यू श्रीराम होलसेल स्टोअर्सचे गोडावूनमधून चोरी झाल्याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शेख मोहसीन (बिल्लू) शेख मुन्ना (आगाखान वाडा, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याच्या मुक्ताईनगरातील मित्राकडे ठेवलेला 23 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अधिक तपासार्थ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, हवालदार शरीफोद्दीन काझी, युनूस शेख रसुल, किशोर ममराज राठोड, विनोद सुभाष पाटील, रणजीत अशोक जाधव, चालक दीपक चौधरी यांनी ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !