मालोदची विवाहिता बेपत्ता


यावल : तालुक्यातील मालोद येथील रहिवासी फातेमा सुपडु तडवी (23) ही विवाहिता 6 नोव्हेंबरपासून किनगाव येथून बेपत्ता झाली असून या प्रकरणी यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. मालोद सुपडू बेलदार तडवी यांच्या खबरीनुसार त्यांची मुलगी फातेमा सुपडु तडवी ही मनोरुग्ण असल्याने पती तिला वागवत नसल्याने ती माहेरी राहते. 6 नोव्हेंबर रोजी ती रमजान रोशन तडवी (रा.किनगाव) यांच्याकडे गेली होती व तेथून ती बेपत्ता झाली. शोध घेवूनही ती न सापडल्याने यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुनील तायडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !