सुसरी शिवारात अज्ञाताने केळीचे 300 घडे कापली
भुसावळ : तालुक्यातील सुसरी, ता.भुसावळ शिवारातील गट नं. 200-1 या शेतातील साडेचार एकर शेतामधील 300 केळीची घडे कापून फेकत जलवाहिनी जागोजागी फोडल्याने प्रचंड नुकसान करण्यात आले आहे तर ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील केबल वायर चोरीला गेल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. बोदवड रस्त्यावरील सुसरी, ता. भुसावळ शिवारात 200-1 शिवारात चंद्रशेखर झोपे यांचे शेत आहे. या शेतात साडेचार एकर जागेत सात हजार केळीची झाडे आहे. या बागेत मंगळवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत अज्ञात व्यक्तीने झाडावरील केळीचे घड कापून शेतात फेकून 1 लाखांपेक्षा अधिक नुकसान केले तसेच पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीदेखील तोडली असल्याने शेतातील पाणीपुरवठादेखील करता आला नाही. या शिवारात सुसरी ग्रामपंचायतीच्या मालकीची पाण्याची विहिर आहे. या विहिरीवरील मोटारील वीजपुरवठा करणार्या केबलची देखीलचोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीसात अज्ञान आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पोलिस उपनिरीक्षक सुनील वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील करीत आहे.

