संघटन मजबूत करावे : डॉ.अजित गोपछडे
भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्राची नाशिकमध्ये बैठक
भुसावळ : नाशिक येथील भारतीय जनता पार्टीच्या वसंत स्मृती या कार्यालयात भाजपा वैद्यकीय आघाडीची उत्तर महाराष्ट्रची विभागीय बैठक झाली. या बैठकीत आगामी संघटना बांधणी व विविध संघटनात्मक विषयावर चर्चा झाली. बैठकीत सुरवातीला भारतीय संस्कृती नुसार जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या सेवाकार्यवर ‘जनसेवक देवेंद्र’ साप्ताहिक विवेकच्या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले.
ई बुकचे विमोचन
भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप महाराष्ट्र प्रदेश व माजी मुख्यमंत्री देवेंद्र जी.फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात विभागवार टीमवर्कने कोविड संकटकाळात केलेल्या सेवाकार्याचे ई बुकचे विमोचन व वाटप करण्यात आले. भाजपा वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून कोरोना काळात नाशिकमध्ये सेवा देणार्या प्रथितयश डॉक्टर्स कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला डॉ.अजित गोपछडे, उत्तर महाराष्ट्राचे संयोजक डॉ.प्रशांत पाटील, नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, होमिओपॅथी विंगचे संयोजक डॉ.भालचंद्र ठाकरे, शहर संयोजक डॉ.चंद्रशेखर नामपूरकर, डॉ.श्रीराम भतवाल, डॉ.नितू पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.अनिल महाजन, प्रदेश सह संयोजक पॅरा मेडिकल विंग विलास भदाणे यांची उपस्थिती होती.
वैद्यकीय आघाडीच्या संघटनात्मक रचना व डॉक्टरांच्या विविध मागण्या व समस्या यावर संवादात्मक चर्चा झाली व नूतन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी सर्व वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदेश सह संयोजक पॅरा मेडिकल विंग
विलास भदाणे यांनी केले.

