वरणगाव उपनिरीक्षक सुनील वाणी यांचा राष्ट्रवादीतर्फे गौरव
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव पोलिस स्टेशनचे हवालदार सुनील वाणी यांची पदोन्नतीपर पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती होऊन वरणगाव पोलिस ठाण्यातच त्यांना नियुक्ती मिळाल्याने त्यांचा वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, साजीद कुरेशी, महात्मा गांधी विद्यालयाचे संचालक चंदू झोपे, सामाजिक कार्यकर्ते अतुल झांबरे, तालुका सरचिटणीस राजेश चौधरी (मट्टी भाई), आरीफभाई पठाण चहावाले उपस्थित होते.

