भुसावळ तालुका पोलिसांची गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहिम


भुसावळ : गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसांनी धडक मोहिम राबवत चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करीत आठ हजार 700 रुपयांची तयार हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. निंभोरा बु.॥ येथील कमलाबाई बाबूलाल निकम यांच्या ताब्यातून दोन हजार शंभर रुपयांची तर जोगलखोरी येथील रवींद्र मंगल सोनवणे यांच्या ताब्यातील दोन हजार 250 रुपये किंमतीची शिंगारबर्डी येथील रवींद्र हरी कोळी यांच्या ताब्यातून दोन हजार 250 रुपये किंमतीची तसेच कन्हाळा बु.॥ येथील चाँद खा चंदू गवळी यांच्या ताब्यातून दोन हजार शंभर रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !