पटना एक्स्प्रेसमध्ये चोरी : 17 हजारांचा ऐवज लंपास


भुसावळ : रेल्वेतील वाढत्या चोर्‍यांमुळे लोहमार्ग व आरपीएफ पोलिसांच्या गस्तीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. पटना एक्सप्रेसमधील प्रवशाची चोरट्यांनी 17 हजारांचा ऐवज असलेली बॅग लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो ईटारसी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला. तक्रारदार आफताफ आलम अन्सार (रा.
नारायणगाव, जि.औरंगाबाद, बिहार) हे अप पटना सुपर एक्स्प्रेसच्या एस-2 या डब्यातील सीट क्रमांक 1 ते 5 वर बसून प्रवास करीत असतांना त्झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी बॅग लांबवली. या बॅगेत मोबाईल, हेडफोन, सोन्याची नाकातील नथ, चांदीचे पैंजण आणि 800 रुपये रोख असा ऐवज होता. ही घटना मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या प्रकरणी अन्सार यांनी
भुसावळ जीआरपी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भुसावळ जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत गुरूवारी इटारसी जीआरपी पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !