बिसाराच्या सायकलपटूंची दोनशे किलोमीटर सायकलिंग : दिवाळी पर्वाचे उत्साहात स्वागत


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रा.प्रवीण फालक, विजय पाटील व विद्याधर इंगळे यांनी 11 रोजी तब्बल दोनशे किलोमीटर सायकलिंग करून भुसावळसाठी एक नवीन विक्रम स्थापन केला. दिवाळी पर्वाची सुरुवात 12 तारखेपासून झाली असून त्याचे स्वागत करण्यासाठी व पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी या तीनही सायकलपटूंनी भुसावळ ते शिरपूर व परत भुसावळ असा दोनशे किलोमीटरचा प्रवास सायकलींग करून पूर्ण केला. सकाळी सहा वाजता सुरू केलेला हा सायकलिंगचा प्रवास भुसावळ येथील गांधी पुतळ्यापासून सुरू केला व साधारण 11 वाजेपर्यंत शिरपूर येथे त्यांनी शंभर किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. त्यानंतर परतीच्या प्रवासात साधारणतः 20 किलोमीटर नंतर दोन ते तीन मिनिटांची विश्रांती अशा पद्धतीने पुन्हा त्यांनी परतीचा शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

दहा तासात केले अंतर पार
संपूर्ण या प्रवासासाठी त्यांना तब्बल दहा तास लागले. इतक्या मोठे अंतर सायकलिंग करण्यासाठी जिद्द, चिकाटी व एकाग्रता हे गुण महत्त्वाचे आहेत, असे प्रा.प्रवीण फालक यांनी नमूद केले. त्याशिवाय आपल्या सोबतच्या सहकार्‍यांचा पाठिंबा व मनोधैर्य हे महत्त्वाचे असल्याचे मत विजय पाटील यांनी व्यक्त केले. प्रवासादरम्यान त्यांना असंख्य नागरीकांनी सायकलिंग करण्याविषयी व या उपक्रमाविषयी माहिती विचारली व इतक्या लांबच्या अंतर सायकलने पूर्ण करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर काही नागरीकांनी यापासून प्रेरणा घेऊन आम्हीदेखील आमच्या शहरात सायकलिंग करू, असे देखील आवर्जून सांगितले, असे विद्याधर इंगळे यांनी सांगितले. या सायकल पटूंचे स्वागत करण्यासाठी यावल येथे भुसावळ रनर्सचे प्रवीण वारके व गणसिंग पाटील हे आवर्जून उपस्थित होते. या तीनही सायकल पटूंचे भुसावल रनर्सचे डॉ.तुषार पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, प्रवीण पाटील, डॉ.चारूलता पाटील, पूनम भंगाले, ब्रिजेश लाहोटी, सचिन अग्रवाल, रणजित खरारे आदी सदस्यांनी अभिनंदन व कौतुक केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !