भुसावळात विद्यार्थ्याने इको फ्रेण्डली कलर्स वापरून साकारली रायगड किल्ल्याची प्रतिकृती


भुसावळ  : भुसावळच्या सेंट अलॉयसीस स्कूलचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी ओम महेशकुमार चौधरी याने सुटीच्या कालावधीत घरातील पुठ्ठे, रद्दी कागद, ईको-फ्रेण्डली कलर्स वापरून रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली. या किल्ल्यात वाहती नदी, पवन उर्जा प्रकल्प, पर्वत, दर्‍या, झाडे दर्शवण्यात आली आहे. कोरोना काळात घराबाहेर खेळायला निघण्यापेक्षा अशा प्रकारे वेळेचा सदुपयोग करून सुंदर अशी किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. हा किल्ला बनवण्यासाठी त्याचे वडील डॉ.महेश चौधरी यांचे सहकार्य लाभले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !