आदिवासी बांधवांसोबत रोटरी रेल सिटी व इनरव्हील रेल सिटीने साजरी केली दिवाळी
भुसावळ : रोटरी रेल सिटीने दत्तक घेतलेल्या मुसाळतांडा व भिलमळी या आदिवासी पाड्यावर फराळ व फटाके वाटप करून दिवाळी साजरी केली. या वर्षी या प्रोजेक्टमधे इनरव्हील रेलसिटीने सुध्दा सहभाग घेतला. आदिवासी बांधवांसाठी शेव, चिवडा, चकली, शंकरपाळे, लाडू असे 2 किलोच्या फराळाचे शंभर घरांमध्ये फराळ वाटप केले. बाल-गोपालांसाठी टिकल्या फोडण्याची बंदूक व रोल भेट दिल्या. कोरोनाच्या संकट काळात ही मदत घेतांना आदिवासी बांधवांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रकल्पासाठी प्रोजेक्ट चेअरमन आशिष अग्रवालसह चेअरमन संदीप सुरवाडे, सचिव विशाल शाह, इनरव्हील अध्यक्षा मोना भंगाळे, सचिव रेवती मांडे व सर्व रोटरी व इनरव्हील सदस्य यांनी परीश्रम घेतले. रो.संदेश अग्रवाल यांचे विशेष सहकार्य लाभले.

