भुसावळातून अपहरण झालेली बालिका सापडली


भुसावळ : बिस्कीटाच्या आमिषाने भुसावळातील 12 वर्षीय अल्पवयीन बालिकेचे अपहरण झाले होते. गुरुवारी ही बालिका सापडली असून ती मावशीकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.  पोलिसांनी बालिकेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अहवाल नॉर्मला आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नेहरू मैदानावर वास्तव्यास असलेल्या एका उतारकरू कुटुंबातील 12 वर्षाची अल्पवयीन बालिका वाल्मीक नगरात भीक मागण्यासाठी गेली असता, तिचे तेथून अपहरण करण्यात आले, अशी फिर्याद मुलीच्या आईने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला हे तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !