कोळगावात दोघा भावंडांचा विहिरीत पडल्याने मृत्यू


श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव येथील दोघा भावंडाचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी घडली.आविष्कार (6), कार्तिक ( 4) अशी दोघा सख्या लहान भावांची नावे आहेत. कोळगाव येथील लगडवाडी परिसरात राहणार्‍या कांतीलाल सोनवणे यांची दोन लहान मुले आविष्कार सोनवणे व कार्तिक सोनवणे हे दोघे घराशेजारी असलेल्या विहिरीजवळ खेळत असताना पाय पाय घसरून पडले. ते बराच वेळ आढळून न आल्याने सोनवणे परीवाराने आपल्या लेकरांची शोधमोहीम सुरू केली. यातील आविष्कार याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना घटना घडल्याचे कुटुंबीयांना सायंकाळी उशीरा लक्षात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !