सर्वे क्रमांक 63 मधील आरक्षणात करावा फेरबदल


वंचित बहुजन आघाडीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन

भुसावळ : शहरातील रेल्वे हद्दीतील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण 15 नोव्हेंबर 2018 रोजी काढण्यात आल्यानंतर या जागेवर राहणारे लोक बेघर झाले होते. दोन वर्षांपासून अतिक्रमण धारकांची प्रशासनाने पुर्नवसनाची कुठलीही व्यवस्था न केल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत. भुसावळ नगरपालिकेकडे या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत बेघरांचा घरांचा लाभ देण्यासाठी नगरपालिका हद्दीतील मौजे सतारेमधील सर्वे क्रमांक 63 मधील 18.60 हेक्टर जमीन शासनाकडे उपलब्ध आहेत मात्र या जागेवर मंजूर विकास योजनेंतर्गत पार्क या हे आरक्षण असल्याने बदलावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली. पालिकेने या संदर्भात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे या संदर्भात 8 ऑक्टोबर 2020 प्रस्ताव पाठवल्याचे निवेदनात नमूद आहे. निवेदनाबाबत दखल घेण्याचे आश्‍वासन तनपुरे यांनी यावेळी दिली. निवेदन देताना युवा जिल्हाध्यक्ष विजय (बाळा) पवार, भुसावळ तालुकाध्यक्ष रूपेश साळुंखे, तालुका संघटक बबन कांबळे, शुभम सोयंके उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !