जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसेंना कोरोनाची लागण
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासह त्यांची कन्या सारा प्रांजल खेवलकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांवर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहिणी खडसे यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू होईल, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.

