सावदा माजी नगराध्यक्ष वानखेडेंना धमकी : एकाला अटक


सावदा : जुना वाद उकरून काढत सावद्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे यांना धमकावून त्यांची सोन्याची चेन हिसकावल्याप्रकरणी मयूर खंडेलवालविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील मयूर कैलास खंडेलवाल याच्याविरूध्द काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणातून गुन्हा दाखल केला होता व हा राग डोक्यात ठेवून शनिवारी रात्री दिवाळीनिमित्त वानखेडे व त्यांचे कुटुंबिय हे गांधी चौकातील मारुती मंदिरात देवदर्शनासाठी जात असतांना या चौकात मयूर खंडेलवाल याने वानखेडे यांना पाहुन मेरे हात बहुत लंबे है, मैं जब चाहु तब तुम्हे उडा दूंगा, असे म्हणुन त्याने धमकी दिली तसेच याप्रसंगी झालेल्या धक्काबुक्कीत मयूर कैलास खंडेलवाल याने वानखेडे यांच्या गळ्यात असलेली 17 ग्रॅम वजनाची सुमारे 68 हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. या प्रकरणी वानखेडे यांनी सावदा पोलिस स्थानकात फिर्याद दिल्यावरून मयूर कैलास खंडेलवाल (स्वामी नारायण नगर, सावदा) याच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात येवून त्यास अटक करण्यात आली. आरोपीला रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहा.पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !