रेल्वे जागेवरील अतिक्रमणग्रस्तांचे पुर्नवसन न केल्यास आंदोलन
रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाचा इशारा
भुसावळ : रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टी उठवण्यास 15 नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झालेले असून या कुटुंबियांचे अद्यापही पुर्नवसन झाले नसल्याने पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तत्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय बाबूराव साळवे यांनी दिला आहे. अतिक्रमण धारकांचे पुर्नवस सर्वे क्रमांक 63/1 या गुरचरण जागेवर करण्यात येणार असून त्यांना पाचशे स्वेअर फुटांचे घर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधून दिले जाणार असल्याने या संदर्भात गांभीर्याने दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. विजय साळवे या संदर्भात 11 नोव्हेंबर 2020 व 21 ऑक्टोबर 2020 व भुसावळ नगराध्यक्षांना व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असल्याचेही त्यांनी कळवले आहे. नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, शासनाने ज्या-ज्या या विषया संदर्भात पाठपुरावा केला त्या संदर्भात संबंधित विभागाने कागदपत्रे सादर केली आहेत.

