रावेरात फटाके फोडण्याच्या वादातून महिलेचा विनयभंग
रावेर : फटाके फोडतांना झालेल्या वादातून महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बौध्दवाडा या भागात शनिवारी रात्री एका महिलेचा पती फटाके फोडत असताना त्यास अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली बोलला की, माझ्याजवळ तू फटाके का फोडीत आहे ? या कारणावरून आरोपी व फिर्यादीचा पती यांच्यात भांडण सुरू झाले. याचवेळी फिर्यादीची सासू ही त्यांचे भांडण सोडविण्यास गेली असता तिचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे आरोपीने कृत्य केले शिवाय या बाबीला पीडीतेने विरोध केला असता तिला चापटांनी मारहाण करण्यात आली तसेच आरोपीने त्यांच्या घरात घुसून पतीस चपटा बुक्क्यांनी मारहाण केली व यावेळी फिर्यादी महिला त्यांचे भांडण सोडविण्यास गेली असता आरोपीने फिर्यादीच्या घरातील विळ्याने फिर्यादीस जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या मानेवर तसेच उजव्या हातावर विळ्याने गंभीर दुखापत केली या संदर्भात संबंधीत महिलेने रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपी अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली (रा.बौद्धवाडा, रावेर) याच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक व त्यांचे सहकारी करत आहेत.

