भुसावळातील खेळाडू घडवणार्या मैदानाची वाताहत
पाईप लाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी मैदानावर : फटाका स्टॉलमुळे मोठ्या प्रमाणावर पसरली अस्वच्छता
भुसावळ : शहरातील खेळाडू घडवणार्या डी.एस.ग्राऊंड (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान) ची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शहरातील क्रीडा प्रेमींकडून सातत्याने या मैदानाचा व्यावसायीक वापर थांबवण्याची अपेक्षा व्यत होत असताना सत्ताधारी व पालिका प्रशासनाने या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्याने क्रीडा प्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दिवाळीत फटाके विक्रीसाठी प्रशासनाने या मैदानावर परवानगी दिली असताना मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली तर सोमवारी पालिकेची पाईप लाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी मैदानावर आल्याने मैदानाची आणखीन रया गेल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
मैदानाची वाताहत थांबवणार : नगराध्यक्ष
डी.एस.ग्राऊंडवर पाईप लाईन फुटली असल्यास त्या संदर्भात संंबंधित यंत्रणेला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात येतील शिवाय मैदानाची दुरवस्था निश्चितच थांबवण्यात येईल व भविष्यात या मैदानाचा व्यावसायीक वापर टाळण्यासंदर्भात दखल घेवू, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.

