भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


भुसावळ : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून व सोशल मिडीयावरून शुभेच्छांचा वर्षाव केला. जामनेर रोडवरील अष्टभूजा डेअरीचे संचालक तथा सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असलेले नितीन धांडे यांचा सोमवार, 16 रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्यावर प्रेम करणार्‍या चाहत्यांसह प्रभागातील नागरीक व विविध क्षेत्रातील नागरीकांनी प्रत्यक्ष त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी आमदारांनी दिल्या शुभेच्छा
माजी आमदार संतोष चौधरी, कृउबा सभापती सचिन चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर आदींनीही धांडे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !