अन् आमदार शिरीष चौधरी निघाले बाजाराला


सावदा : एरव्ही आमदार भाजीपाला बाजारात खरेदीसाठी जात नाहीत मात्र रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी चक्क भाजी बाजारात निघाल्यानंतर अनेकांसाठी हा विषय चर्चेचा ठरला. झाले असले की, दिवाळीनिमित्त संपूर्ण स्टाफला सुट्टी दिल्यामुळे आमदार चौधरी यांना त्यांच्या पत्नी अरुणा चौधरी यांनी सक्तीने बाजार करून आणण्याचे फर्मान बजावताच आमदार चौधरी हे उत्साहाने पिशवी घेवून बाजारासाठी सावदा येथील बाजारात रविवारी दाखल झाले. यावेळी त्यांनी भाजी विके्रत्यांशी दिलखुलासपणे संवाद साधून भाजीपाल्याची खरेदी केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !