भुसावळात माहेश्वरी समाजातर्फे अन्नकुट महोत्सव


भुसावळ : शहरातील माहेश्वरी भवनात माहेश्वरी समाजातर्फे अन्नकुट महोत्सवाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. यावेळी माहेश्वरी समाजाचे उपाध्यक्ष मनोज बियाणी व संगीता बियाणी यांच्याहस्ते पूजन झाले. प्रसंगी सेक्रेटरी सत्यनारायण सोनी, तहसील अध्यक्ष प्रवीण भराडीया, सेक्रेटरी राजेश लढ्ढा, युवा संगठन अध्यक्ष चंद्रकांत मंत्री, सेक्रेटरी महेश हेडा, विनोद बियाणी, कमलेश झंवर, राजेश पारीख, महिला मंडल जिल्हाध्यक्ष राधा झंवर, शहराध्यक्ष वीणा झंवर, सेक्रेटरी शुभांगी हेडा, वरीष्ठ महिला मंडल अध्यक्ष अयोध्यादेवी मंत्री, सेक्रेटरी विमल काबरा, मयुर नागौरी, गोपाल हेडा, ब्रिजेश लाहोटी, मनोज मंत्री, आकाश काबरा, दीपक झंवर, गिरीष मंत्री, घनश्याम मंडोरे, द्वारकादास हेडा, सर्वेश लाहोटी, मुकेश काबरा, संजय लाहोटीसह समाजबांधव उपस्थित होते. त्यानंतर अन्नकुट महोत्सव प्रसादाचे वाटप करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !