भाजपा सोडण्यासाठी मला भाग पाडण्यात आले : माजी मंत्री एकनाथराव खडसे
जळगाव : मी भाजपात असतांना जाणीवपूर्वक मी सोडण्यास भाग पडवे, अशी परीस्थिती अशी निर्माण करण्यात आली, असा खळबळजनक दावा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केला. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सुमारे महिना भरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी प्रवेशानंतर बुधवारी प्रथमच त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात मेळावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. खडसे म्हणाले की, ‘बहुजनांना न्याय देणार्या पक्षात आलो, शरद पवार यांनी मला प्रवेश दिला त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो, असे खडसे म्हणाले.


