वरणगावात अडीच वर्षात झालेला विकास हा जिल्ह्यात आदर्श
जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन : वरणगावात जीमसह उद्यानाला दिली भेट
भुसावळ : वरणगाव शहराला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी 70 कोटींचा निधी अडीच वर्षात उपलब्ध करून दिला व आज त्या निधीतून वरणगाव विकासाचे शहर म्हणून वाटचाल होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. वरणगाव शहराच्या विकासासाठी कमी वेळात अडीच वर्षांपैकी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सहा-सहा महिन्यांची वगळता फक्त दीड वर्षात वरणगाव शहरासाठी 25 कोटींची पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांसाठी धडपडे असलेल नगराध्यक्ष सुनील काळे होते म्हणून वरणगावशहरात अडीच वर्षात खूप काही बदल घडला, असा आशावाद जामनेरच्या नगराध्यक्षा साधना गिरीष महाजन यांनी वरणगावात व्यक्त केला. वरणगावातील आधूनिक ओपन जिम व सात गार्डन उभारण्यात आले असून मच्छिंद्र नगरातील उद्यानाला साधना महाजन यांनी भेट देवून पाहणी केली असता त्या बोलत होत्या.
वरणगाव पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार
याप्रसंगी साधना महाजन यांनी आगामी निवडणुकीत वरणगाव नगरपरीषदेवर भरीव विकासकामे झाल्यामुळे निश्चितच भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेविका माला मेढे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, रुपाली काळे, भाजपाचे सुनील माळी, नामदेव पहेलवान, अरुण बावणे, सचिन मेथळकर, विलास तायडे, छगन पवार, गोविंदा चौधरी, हितेश चौधरी, कमलाकर मराठे, आकाश निमकर, प्रशांत मोरे, संजय बेदरकर, अॅड.ए.जी.जंजाळे, प्रवीण ढवळे, कामगार नेते मिलिंद मेढे, पप्पू ठाकरे, मिलिंद भैसे यांच्यासह असंख्य नागरीक उपस्थित होते.

