रावेरात वाळू चोरीचे ट्रॅक्टर लांबवताना एकाला अटक
रावेर : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी कारवाई दरम्यान जप्त केल्यानंतर हे ट्रॅक्टरच लांबवण्याचा प्रकारात रावेरात घडत असताना पोलिसांनी एकाला अटक केी. मनोज तुकाराम कोळी (30, रा. अटवाडे, ता.रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रावेर शहरातील बर्हाणपूर रोडव वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले होते. मंगळवार, 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी मनोज तुकाराम कोळी हा ट्रॅक्टर नेत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्यास अटक केली. उमेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय शेख इस्माईल करीत आहेत.

