जुन्या घराचा स्लॅब कोसळल्याने केर्‍हाळ्यात युवकाचा मृत्यू


रावेर : तालुक्यातील केर्‍हाळा येथे जुन्या घराचा स्लॅब कोसळल्याने 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. फिरोज रूबाब तडवी (30) असे मयत युवकाचे नाव आहे. केर्‍हाळा गावातील वैभव वासुदेव महाजन यांच्या घराच्या पय्याच खोदकाम सुरू असताना अचानक घराचा स्लॅब कोसळल्याने फिरोज रूबाब तडवी हे गंभीर जखमी झाले. त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परीवार आहे. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या तडवी यांचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !