भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी


नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने केंद्राने त्याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर उद्या मध्यरात्रीपासून बंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा आला आहे. भारतातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विमान वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता केंद्र सरकारनेही भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घातली आहे.

ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरतोय विषाणू
इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे. आम्ही ब्रिटनच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात आहोत. ते नवीन विषाणू संदर्भातील विश्लेषण आणि चालू असलेल्या संशोधनाची माहिती आम्हाला देत आहेत. यासंदर्भात आम्ही लोकांना अद्यायावत करत आहोत. आम्ही नवीन कोरोना विषयी जाणून घेत असून लवकरच या व्हेरिएंटच्या वैशिष्ट्यांचे स्पष्ट चित्र असेल, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !