सामूहिक अत्याचारानंतर महिलेची हत्या


उत्तरप्रदेश : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये उत्तरप्रदेशात सातत्याने वाढ होत असून एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानंतर या महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना यु.पी.तील बदायूं जिल्ह्यातील उघाईटी भागात रविवारी रात्री घडली. शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी महंत सत्यनारायण दास याच्यासह त्याच्या एका शिष्य वेदराम आणि चालक यशराज यांच्यावर सामूहिक बलात्कारासह हत्येचा गुन्हा दाखल केला. हाथरस घटनेनंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !