भुसावळातील प्रभाग क्रमांक 11 मधील नागरीकांचे आरोग्य धोक्यात


इंडियन युनियन मुस्लीम लिगचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ  : शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील बाजार वॉर्ड, इमलीपुरा, जाम मोहल्ला भागातील बहुतांश गल्ल्यांमध्य गेल्या अनेक दिवसांपासुन साफसफाई न झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
परीसरातील गटारी तुंबल्या असल्याने माशांचे व डासांचे प्रमाण वाढले आहे शिवाय पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणीपुरवठा होत असून साथरोगांचा फैलाव होण्याची भीती आहे. या संदर्भात इंडियन युनियन मुस्लीम लीगतर्फे पालिका मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना निवेदन देण्यात आले.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
मुख्याधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर सैय्यद सादीक अली, मजहर शेख, रूपेश अग्रवाल, नवीन अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, मोहन मराठे, अमजद खान, सैय्यद वासीफ अली, प्रतिभा अग्रवाल, अजहर शेख आदींची निवेदनावर नावे आहे.


कॉपी करू नका.